Shruti and Jati – Rasa System

 

षड्ज  1) तीव्रा – द्वीफ्ता  2) कुमुद्वती – आयता 3) मंदा – मृदु     4) छंदोवती – मध्या                                            ऋषभ  1) दयावती – करुणा                               2) रंजनी – मृदु   3) रक्तिका – मध्या

गांधार  1) रौद्री – द्वीफ्ता   2) क्रोधी – आयता

मध्यम  1) वज्रिका – द्वीफ्ता 2) प्रसारिणी – आयता 3) प्रीति – मृदु        4) मार्जनी – मध्या

पंचम    1) क्षिती – मृदु          2) रक्ता – मध्या     3)संदीपिनी – आयता  4) आलापिनी – करुणा

धैवत   1) मदन्ती – करुणा    2) रोहिणी – आयता   3) रम्या – मध्या

निषाद  1) ऊग्रा – द्वीफ्ता                                                                2) क्षोभिणी – मध्या

इथे हे लक्षात येते की यात संवाद कसा आहे –

1) द्वीफ्ता – आयता  आणि मृदु – मध्या हा 81/80 प्रमाण संबंध आहे.

2) षड्ज आणि मध्यम याच्या श्रुति जाती सारख्याच आहेत.

3)  निषाद चे ‘द्वीफ्ता – मध्या’ रूप हे षड्ज आणि मध्यम याच्या श्रुतिंचे आकुंचित रूप आहे.

4)  मध्यमच्या प्रथम दोन व गांधारच्या श्रुति ‘द्वीफ्ता- आयता’ या सारख्याच आहेत

5)ऋषभची पहिली श्रुति करुणा तसेच पंचमाच्या शेवटच्या धैवतची प्रथम श्रुति करुणाच आहे.

6) गांधार व निषाद दोन्ही स्वरांच्या प्रथम श्रुति द्वीफ्ता या समान असल्या तरी गांधारच्या दोनही श्रुति द्वी आयता या षड्जच्या प्रथम दोन श्रुतिबरोबर संवाद साधणाऱया आहेत.तर

7) मध्यम ची प्रथम व निषाद ची प्रथम दोन्ही द्वीफ्ता जातीच्या तर

मध्यम ची चतुर्थ व निषाद ची द्वितीय या दोन्ही मध्या जातीच्या आहेत.(ती.म व ती.नि नाते सांगणाऱया)

आयता  –   मृदु   – मध्या – करुणा – द्वीफ्ता  यांचा संबंध

अतिकोमल – कोमल – शुद्ध   – तीव्र   – तीव्रतर

या वर्गीकरणाशी असून सा, म, रे, ध, हे शुद्ध सूर मध्या जातीचेच आहेत तर मध्यम ग्रामात

पंचम 16 व्या श्रुतिवर आल्याने ग, प हे दोन्ही आयता जातीचे होतात.

इथे या श्रुतिंचे नामकरण व जातिप्रमाणे वर्गीकरण हे वादी – अनुवादी – संवादी – विवादी – वर्ज्य

यांच्याशी व म्हणून राग व समय यांच्याशी सुसंबंधित वाटते.

पृथ्वी    –   आप      –  वायु    –  तेज   – आकाश    या पंचतत्त्वांचा संबंध

द्वीफ्ता     – आयता       – मृदु    – मध्या  – करुणा      यांचा संबंध

अतिकोमल     – कोमल    – शुद्ध    – तीव्र   – तीव्रतर     यांचा संबंध किंवा

शांत      – शृंगार     – हास्य     – करुण  – अद्भुत  या सामान्य मानवी भक्ती रस निष्पत्ती संबन्धित  व

शांत    – बीभत्स    – वीर      – भयानक – रौद्र   या अमानवी विकृत रस निष्पत्तीशी संबन्धित आहे हे जाणवते.

 

या प्रकारे पाहिले तर

कोणतीहि श्रुति घेतली ती सा मानली तर (इथे श्रुति म्हणजेच फ्रिक्वेंसी हे स्पष्ट होते.)

ती प्रथम उद्दीपित केली म्हणून द्वीफ्ता श्रुति आणि तेथ पासून 16/15 प्रमाणांतरावर करुणा 

श्रुति असते जी पुढल्या स्वरीची कोमल म्हणून करुणा स्मृति असते एवढे स्पष्ट होते

तो सूर चतुःश्रुति करावयाचा तर

1ल्या श्रुति पासून 81/80 प्रमाणांतरावर आयता श्रुति

1ल्या श्रुति पासून 25/24 प्रमाणांतरावर मृदु श्रुति

1ल्या श्रुति पासून 135/128 प्रमाणांतरावर मध्यम श्रुति

1ल्या श्रुति द्वीफ्ता पासून 16/15 प्रमाणांतरावर पुढच्या स्वराची प्रथम ती करुणा श्रुति असते तर उलट

1ल्या श्रुति द्वीफ्ता पासून 15/16 प्रमाणांतरावर आधीच्या स्वराची अंतिम श्रुति मध्या असते.

4 थ्या श्रुति मध्या पासून 80/81 प्रमाणांतरावर आधीच्या स्वराची चतुर्थ श्रुति मृदु असते.

1ल्या श्रुति द्वीफ्ता पासून 10/9 प्रमाणांतरावर आधीच्या स्वराची द्वितीय श्रुति मृदु  असते.

4 थ्या श्रुति मध्या पासून 9/10 प्रमाणांतरावर आधीच्या स्वराची द्वितीय श्रुति आयता असते.

4 थ्या श्रुति मध्या पासून 128/135 प्रमाणांतरावर आधीच्या स्वराची प्रथम श्रुति द्वीफ्ता असते.

या प्रकारे उद्दीपित होणारी द्वीफ्ता , , सा नि (प्रचतुर्थे तथैव म्हणजे प्रमाणेच सानि यात)

 तर करुणा ही अतिस्वारे वा तृतिय म्हणजे रे आणि पंचमात (कृष्टे) यातच असतात

यातूनच वादी संवादी साकारतात असे जाणवते रे , रे , सा , नि इत्यादि.

हे श्रुति जातीचे ज्ञान असले तरच तो आचार्य संबोधला जातो.

याप्रकारे हे श्रुतिंचे ज्ञान असले की मगच त्यास आचार्य संबोधता येते.

दीफ्तायता तु करुणानाम्  मृदुमध्यमयोस्तथा

 श्रुतीनाम् यो।़विशेषज्ञो आचार्य उच्यते ।।

 दीफ्ता मंद्रे द्वितीये प्रचतुर्थे तथैव तु

 अतिस्वारे तृतीयेच कृष्टे तु करुणाश्रुति ।। ( ना.शि.कं. 7, 9-10 पृ.40-41)

                                                       (हिं.सं..भा.2 पृ.14)

This is the data which is shared internationally but  Sa or Shadja swar or tone is  four shruti further Re or Rishabh tone or D is supposed to be of three shrutis with 9/8 s